Tuesday, December 18, 2012

एक कोपरा दाखव देवा


परवा दिल्लीत बसमधे एका तरुणीवर कांही श्वापदांनी बलात्कार केला. ही बातमी वाचून आणि टी.व्ही.वर या बाबत चर्चा ऐकून मन उद्विग्न झाले. प्रथमच मला मी एक भारतीय असल्याची लाज वाटली. अतिशय दु:खी मनाने ही रचना लिहिली नाही तर कलमेतून आसवांप्रमाणे ओघळलेली आहे. प्रस्तूतः

तारुण्याच्या लोण्यासाठी
शक्य कसे हे? बोका नाही
एक कोपरा दाखव देवा
जिथे स्त्रियांना धोका नाही

मला वाटते स्त्रीची अब्रू
मळलेल्या कणकीसम असते
घरात उंदीर कुरतडती अन्
गिधाड बाहेर चोंच मारते
एक रात्रही नसते जेंव्हा
चुकला ह्रदयी ठोका नाही
एक कोपरा दाखव देवा
जिथे स्त्रियांना धोका नाही

कसा कायदा देशामध्ये?
बलात्कारिता दु:ख भोगते
पळवाटांचा घेत सहारा
नराधमांचे खूप फावते
अटके आधी मिळे जमानत
बाल तयांचा बाका नाही
एक कोपरा दाखव देवा
जिथे स्त्रियांना धोका नाही

इमाम, पाद्री, भगवे साधू
सभ्य मुखवटे, क्षुद्र माणसे
धर्म अफूची गोळी देती
कुणी न पाळी तत्व फारसे
सार्‍या नजरा वखवखलेल्या
कुणीच बाबा काका नाही
एक कोपरा दाखव देवा
जिथे स्त्रियांना धोका नाही

नराधमाला स्त्रीलिंगी अन्
पतिव्रतेला पुल्लिंगी का
शब्द नसावा? तुझी माणसा
हीच खरी रे शोक-अंतिका
सभ्य मुखवटा टिकून असतो
जोवर गावत मौका नाही
एक कोपरा दाखव देवा
जिथे स्त्रियांना धोका नाही

ऐलतिराची गंगा थकली
धुवून पापे दुष्टजनांची
काय राहिले जगात आता?
ओढ लागली पैलतिराची
तरावयाला भवसागर हा
आज कुठेही नौका नाही
एक कोपरा दाखव देवा
जिथे स्त्रियांना धोका नाही


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

कैदेत बंद आहे


आरंभ या जगाचा
मी निर्विवाद आहे
का मी परंपरांच्या
कैदेत बंद आहे?

आहोत अप्सरा पण
अस्तित्व काय आमचे?
देवास रिझविण्याला
का रोज नाचायचे?
नारीस शोषण्याचा
आय्याश छंद आहे
का मी परंपरांच्या
कैदेत बंद आहे?

वस्तीत लुटारूंच्या
हसणे जरा उमलणे
उपयोग संपल्यावर
कोमेजणे नि सुकणे
निर्माल्य वळचणीला
सरला सुगंध आहे
का मी परंपरांच्या
कैदेत बंद आहे?

मेल्यासमान जगणे
जगता हजार मरणे
पर्याय हेच आम्हा
तगमग उरात जपणे
गुदमर कुणा न दिसतो
हे विश्व अंध आहे
का मी परंपरांच्या
कैदेत बंद आहे

चुरगळ कळ्या फुलांचा
लिलया करून जाती
निर्लज्जपणे दिवसा
फिरतात उजळमाथी
का आमुचाच देवा
अंधार गर्द आहे?
का मी परंपरांच्या
कैदेत बंद आहे

मागून का जगी या
मिळते कुणास कांही?
लढण्या शिवाय आता
दुसरा उपाय नाही
हातात खड्ग धरले
मनिषा बुलंद आहे
का मी परंपरांच्या
कैदेत बंद आहे


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Monday, December 17, 2012

तुझीच आठवत प्रीत होतो


उबार्‍यात मी पंखाखाली
थंड चांदण्यास पीत होतो
विरहकाळच्या अवसेला मी
तुझीच आठवत प्रीत होतो

लपाछपीचा खेळ खेळता
तुझी मस्करी करीत होतो
व्यर्थ शोधले, मी तर लपलो
गालावरच्या खळीत होतो

ग्रिष्म जसा तुज छळू लागला
मी पडलो काळजीत होतो
तुला गारवा देंण्यासाठी
आलो श्रावणसरीत होतो

मला उदासी कधी न शिवली
समीप तुझिया खुशीत होतो
रोज नव्याने माळलेस त्या
गजर्‍याच्या टवटवीत होतो

तुला वाटले तुझ्याविना मी
विरहाच्या तावडीत होतो
कयास चुकला तुझा, मी तुझ्या
स्वप्नांच्या पालखीत होतो

गुदमरलो मी तुझ्या जरासा
आठवणींच्या धुळीत होतो
कुणात रमलो?, मी तर वेडे
तुजवर कविता लिहीत होतो

शमा पाहिली तेवत असता
म्हणून मी मैफिलीत होतो
परवान्यासम जळण्यासाठी
आस मनी जागवीत होतो

कधी जाहले प्लॅटोनिक लव्ह?
शोधत मी डायरीत होतो
तू चौथीच्या बोर्डाला अन्
मजनू मी सातवीत होतो


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com


Friday, December 14, 2012

बेगाने रह गये

लब पर उदास विरह के
दो गाने रह गये
इतने करीब आ कर भी
बेगाने रह गये

मंज़िल नही थी और कोई
जाये तो किधर जाये?
सुनता नही है आज कोई
गाये तो किधर गाये
आरमाँ बहूत थे सोये
जगाने रह गये
इतने करीब आ कर भी
बेगाने रह गये

मुसकान झलकती थी मेरी
मेरी हर एक बात पर
लिखा था नाम तुमने मेरा
नर्म रेत पर
गाने मिलनके साज पर
बजाने रह गये
इतने करीब आ कर भी
बेगाने रह गये

हम से कभी न आया गया
ना तुम बुला सके
दुनिया के डर को कभी
ना हम भुला सके
मौसम था प्यार का मगर
अनजाने रह गये
इतने करीब आ कर भी
बेगाने रह गये


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३


Saturday, December 8, 2012

ज़ख्म

ज़ख्म मेरे, आप कहिये
आपसे क्या कह गये?
देख लेना ज़ख्म हसते
दर्द सारे सह गये

ज़ख्म तेरा एक काफ़ी
है भुलाने दर्द सारे
शुक्रिया तेरी वजह से
दर्द है बेदर्द सारे

मत डराओ ज़्खमसे यूं
ओ मेरे हमराह है
काफ़ीले खुशियोंके हरदम
मेरे लिये गुमराह है

बेजुबाँ है ज़ख्म मेरे
ज़िक्र उनका क्यों करे?
अपनोंने कुछ दिये, कुछ
उनसे मिले जो है परे

ज़्ख्म काफ़ी है पुराने
और कुछ तो है नये
सुर्ख हाथोंको सहारा
देते रहे सब कुछ सहे

ज़ख्म कहते है, ये इन्सां
दर्द मे खुश है अजब !
दर्द की बस्तीमे रुतबा
खैरमक़्दम बा आदब


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Sunday, December 2, 2012

सुखाचा शोध

सुखाचा शोध

वार शनीवार. वेळ सायंकाळचे साडेसात. फोनची घंटा खणाणली आणि आम्हा दोघांच्याही- मी आणि माझी पत्नी- चेहर्‍यावर एकदम खुशीचे भाव उमटले. सौ. लगबगीने फोनजवळ गेली. अकेरिकेहून मुलीचा फोन होता. त्या काळी मोबाईल जास्त प्रचलीत नव्हते. सोफ्यावर बसून ती मुलीशी बोलत होती. फोनवर मायलेकीच्या प्रशस्त गप्पा चालू होत्या. वीकएंडला काय केले? नातीचं कसं काय चालू आहे? आमका आमका पदार्थ कसा बनवायचा वगैरे वगैरे. आशा गप्पा पाऊण तास ते एक तास चालायच्या. मी तिच्या जवळ बसून गप्पा शांतपणे ऐकत किंवा ऐकण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटचे दोन तीन मिनिटे माझा नंबर लागायचा. बाबा म्हणजे प्रकृती कशी आहे? प्रकृतीला जपत जा आणि पैशाची काळजी करू नका एवढ्या पुरतेच! मी तरूण असताना फोन नव्हते. पत्र लिहायचा प्रघात होता. आज मला चांगलं आठवतय की मी आईलाच पत्र लिहित असे आणि अगदी शेवटी बाबांना साष्टांग नमस्कार एवढाच काय तो त्यांचा उल्लेख असायचा. फरक एवढाच की आमच्या वेळी जे लेखी होतं ते आता फोनवर तोंडी झालं आहे. रविवारी मुलगा आणि सूनबाई फोन करत असत. नातं जरी वेगळं असलं तरी संभाषणाचा आकृतीबंध तोच. फोनवरील संभाषण संपलं की पुन्हा भयाण एकटेपण, खिन्नता, खायला येणारं प्रशस्त घर.
हा प्रकार गेली पंधरा वर्षे आमच्या आयुष्यात चालू आहे. पहिले चार पाच वर्षे मुले परदेशी गेल्यानंतर नोकरीच्या कामात मी खूप व्यस्त होतो. पत्नी पण बर्‍या पैकी तिने निर्माण केलेल्या मैत्रिणिच्या समूहात व्यस्त असायची. जसा निवृत्त झालो तसा एकटेपणाच्या आणि रिकामपणाच्या झळा जास्तच जाणऊ लागल्या.
मुलं आलटून पालटून दोन वर्षातून एकदा यायची, तीन आठवड्यासाठी. या तीन आठवड्यात थोडे दिवस सूनबाईच्या माहेरी किंवा मुलीच्या सासरसाठी असत. पण हे दिवस म्हणजे आमच्या जीवनातील सुवर्ण काळ ! या काळात खर्‍या अर्थाने आम्ही दिवाळी साजरी करत असू. घरात गर्दी, नातवंडांचा गोंध्ळ, घरातला अस्ताव्य्स्तपणा, पण सगळं कसं आम्हा दोघांनाही आवडायचं. हिची तर खूप गडबड असायची. कोणाला काय आवडतं याची यादी तयार करून आठवून आठवून पदार्थ बनवणे आणि मायेने भरवणे हा तिचा आवडता छंद होता.
मुलं परत गेली की पुन्हा घर मोठं वाटायला लागायचं. अक्षरशः घर खायला उठत असे. तसं पाहिलं तर घरात काय नव्हतं? पैसा अडका, चैनीच्या वस्तू, उच्चभ्रू वर्गात मोडणारं रहाणीमान. पण कशाची तरी वानवा नेहमीच जाणवायची. आयुष्याला एकटेपणाची किनार कायम काचत असे. सारे आहे पण कांहीच नाही अशी अवस्था होती. मुलं असताना दिवस कसे भुर्रकन उडूणन जायचे. म्हणतात ना आसवाचे दिवस कासवाचे असतात ! आम्ही हेच तंतोतंत अनुभवत होतो.
आयुष्य पण कसं विचित्र असतं पहा! उतारवयात जेंव्हा नको तेंव्हा पैसा भरपूर असतो. डॉक्टरांनी घातलेल्या बंधनामुळे खाण्यावरचा खर्च पण अगदी माफक असतो. मुलं सातासमुद्रापार असल्यामुळे वृध्दापकाळी भरपूर एकांतवास (प्रायव्हसी) मिळतो जो आता जीवघेणा भासतो.
असच चाचपडत जीवन जगत असताना, एकेदिवशी कांही जणांच्या संपर्कात येवून आमच्या विभागात हास्यक्लब आणि ज्येष्ठ नागरीक संघाची स्थापना झाली. आम्ही दोघेही सर्व कार्यक्रमात खूप सहभाग घेऊ लागलो. नवीन लोकांचा सहवास लाभल्यामुळे एकलकोंडेपणा जरासा दूर झाला. श्वास थोडा मोकळा झाल्यागत वाटायला लागला.

आमच्या घराच्या जवळच एकदीड किलोमिटर अंतरावर मुलांचा एक अनाथाश्रम आहे. त्या आश्रमास आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी भेट द्यायला गेलो. तेथील एकएक गोष्ट ऐकून, पाहून मन कसं पिळवटून निघालं. संस्थाचालकांचा सेवाभाव पाहिला आणि मी नतमस्तकच झालो.
आम्ही उभयतांनी यावर चर्चा करून या अनाथाश्रमाशी जोडून घ्यायचं ठरवलं. आता आम्ही आठवड्यातून दोन तीन दिवस आश्रमात जात असतो. पडेल ते आणि जमेल ते काम तिथे करतो. तिला संगीताचं अंग असल्यामुळे ती तिथे गाणं शिकवते.
काळाच्या ओघात आमचं त्या मुलांशी नातं विणलं गेलय. त्यांचे निरागस चेहरे, वाळवंटात हिरवळ दिसल्यावर जसे वाटते तसे समाधान देतात. सुरुवातीला स्वतःला विरंगुळा या मर्यादित कारणासाठी आम्ही जात असू. आता त्या संस्थेशी आम्ही छानपणे बांधले गेलो आहोत. विरान आयुष्यात कारंजं असावं तसं झालय आम्हाला. जीवनाचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. आता आम्हाला मोकळेपणा असा नसतोच.
अनाथाश्रमाच्या वर्धापन दिना निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम करायचा होता. माझ्या पत्नीने खूप मेहनत घेऊन मुलांकडून गाणी बसवून घेतली. कार्यक्रमात जेंव्हा सर्व श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात गाण्यांना दाद दिली तेंव्हा माझ्या पत्नीलाच मूठभर मास चढल्या सारखं वाटलं. आम्हा दोघांनाही खूप खूप आनंद झाला.

एकदा प्रकृती ठीक नसल्या कारणाने आम्ही दोघेही अनाथाश्रमात एक आठवडा जाऊ शकलो नाहीत. लगेच आश्रमातील चार मुले घरी चौकशीसाठी आली आणि येताना आश्रमात नाश्त्यासाठी केलेले थोडे पोहे आमच्यासाठी घेवून आले. पोहे थंडगार झालेले होते  पण त्यात आपुलकीचा भरपूर उबारा होता  पोहे खाताना मन कसं भरभरून येत होतं. त्या रात्री आवंढा गिळत या नवीन नात्यावर थोड्या ओळी भावना व्यक्त करण्यासाठी लिहिल्या ज्या अशा होत्या.

जे कुणी नव्हतेच माझे, सोयरे झाले कसे?
वृक्ष असूनी पिंपळाचा फूल हे आले कसे?

मायबापांनी मुलांना सोडले रस्त्यात का?
गोड त्यांच्या हासण्याला लावले ताले कसे?

त्या निरागस बालकांना आस नव्हती फारशी
अल्प ओलाव्यात कळले विश्व हे चाले कसे

ग्रिष्म होती जीवनाची कुंडली माझ्या तरी
प्रेम शिडकाव्यात माझे अंग हे न्हाले कसे?

आता विचार करायलाही वेळ नसतो एवढी गती जीवनाला प्राप्त झाली आहे. पण जेंव्हा जेंव्हा विचार करतो तेंव्हा तेंव्हा मनात येते की एकेकाळी आम्ही सुखाचा शोध सातासमुद्राच्या पार म्हणजेच मुलगा, मुलगी, सूनबाई, जावईबापू आणि नातवंडात घेत होतो पण दु:खीच होतो. थोडा सकारात्मक विचार आणि कृती केली आणी सुखाचा झुळझुळता झरा घराजवळच सापडला. यालाच तर म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा!


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Saturday, December 1, 2012

अच्छा बुरा

सीख न दो अच्छा बनने की
संकटमे होगी धरती
हम लोगों के कारण होती
अच्छे लोगोंकी आरती

ऋषी मुनी ज्ञानी न पनपते
अज्ञानीबिन यहाँ वहाँ
पाँच पांडवों के हित मे ही
जन्मे कौरव शतक यहाँ

रामकी प्रतिमा यूं न दमकती
अगर न होता रावण
ग्रिष्म न होता कालचक्रमे
मन न लुभाता सावन

महिषासुरने रक्त बहाया
पुजनीय बनी काली माँ
बुराइयाँ इस जगमे रहते
अच्छोंकी है शुभ प्रतिमा

संशयग्रासित राम न होते
अग्निदिव्य क्यों करे सीता
अर्जुन जब संभ्रम मे डूबे
जगने पायी अमर गीता

क्या अच्छा क्या बुरा विश्व मे
एकबिना है दूजा आधा
बुरों को रहना है बुरा ही
विश्व हित का गणित है साधा


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com