खूप वर्षापूर्वीची एक जुनी प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे. ही इतक्या दिवसांनी का आठवावी हे एक एक गूढच आहे. नुसती आठवलीच नाही तर डोक्यात भिरभिरायला पण लागली जरी ती घडलेली गोष्ट तशी नगण्यच होती. मी त्यावेळी स्टेट बँके ऑफ हैद्राबादच्या हैदराबादस्थित हेड ऑफिस मधे कामाला होतो. नुकतीच बढती झाल्यामुळे अस्मादिक खुश होते. माझे घर त्यावेळी कांही दिवस औरंगाबादला होते. अधून मधून हैदरबाद ते औरंगाबाद जाणे येणे चालूच असे.
एकदा असाच मी औरंगाबाद ते हैदराबाद प्रवास करत होतो. रात्री औरंगाबाडहून बसायचे आणि सकाळी हैदराबाद. एकदा मी संध्याकाळी रेल्वेतून प्रवास करत असताना रात्री साडेआठच्या सुमारास जेवण आटोपून बर्थवर झोपायच्या तयारीत होतो तेवढ्यात एका छोट्या स्टेशनवर एक पोर्या डब्यात शिरला. पांढराशुभ्र पायजमा, नेहरूशर्ट, कपाळाला पांढराशुभ्र गोपीचंदाचा मोठा टिळा लावलेला . पोर्या एकूण चुणचुणीत होता. मोठ्याने बोलण्यावरून ध्यानात आले की तो हस्तरेषा पाहून भविष्य सांगत होता. हेच त्याचे रोजीरोटीचे साधन असावे.
त्याची बोलण्याची लकब पण खूप छान होती, तो सर्वांचे लक्ष स्वतःकडॅ वेधून घेण्यात तरबेज होता. प्रत्येकाचे भविष्य तो आत्मविश्वासाने सांगायचा. त्याचा चुणुकदारपणा पटकन डोळ्यात भरत होता. त्याची भविष्य सांगायची लकब वाखाणण्याजोगी होती. तो सर्वांचे लक्ष पटकन वेधून घेत असे. मी त्याला बघून आणि त्याच्या आत्मविश्वासावर जाम खुश होतो. अर्थात भविष्य कथनावर कुणी किती विश्वास ठेवायचा हे ज्यांनी त्यांनी ठरवायचे असते.
एक बर्यापैकी शिकलेले गृहस्थ भविष्य ऐकण्यासाठी त्याच्याजवळ गेले. पहिले पाच दहा ममिनिटाचे प्राथमिक बोलणे झाले की त्या पोराने त्या माणसास विचारले की तू जर भविष्य सांगू शकतोस तर ओळख मला किती लेकरे आहेत ते. त्या मुलाने बोटावर कांही तरी मोजत विचार केल्याचा आव आणला आणि सांगितले की आपणास पाच मुले आहेत. तो माणूस जिंकल्याचा आव आणत म्हणाला की तू काय भविष्य सांगणार? पहिल्याच प्रश्नाचे उत्तर चुकले तुझे. मला तीन मुले आहेत आणि तू पाच म्हणतोस! लोकांना बनवण्यासाठी तुम्ही लोक हे उद्योग करता. हार मानेल तो भविष्यकार कसला! त्याने अजून कांही चोपड्या काढल्या आणि बोटावर नवखे हिशोब मांडले. त्याने ठासून सांगितले की तुमच्या नशिबात पाचच मुले आहेत; पण आपण फॅमिली प्लॅनिंगची औषधे वापरल्याने ही सगळी गडबड झाली. त्याच्या समयसूचकतेवर खुष होवून त्या माणसाते त्याच्या हातात दहा रुपयाची नोट ठेवली आणि पुढच्या स्टेशनवर तो उतरून गेला. त्या मुलाने माझ्या मनात विचाराचे बरेच वादळ उठवले.
अजून एक विचित्र योगायोग असा की जवळ जवळ तीस वर्षांनी मी पुन्हा हेडऑफिसमधे एका डिपर्टमधे कामाला होतो. एक पंचेविशीतला तरूण डिपार्टमधे आला. पांढरेशुभ्र कपडे, चंदनाचा टिळा आणि भविष्य सांगणाराच. मी त्याला शंका आल्याने जरा खोदून विचारले असता त्याने सांगितले की येथे खूप वर्षापासून तो भविष्य सांगायला येतोय. अजून थोड्या गाप्पानंतर खात्री पटली की हा मुलगा आणि आधी भेटलीला एकच माणूस आहे. मी त्याला बोलल्यानंतर माझ्या ध्यानात आलेते असे:
१) भविष्य वगैरे कांहीही नसते. हे सारे थोतांंड आहे.
२) लोकांची अंधश्रध्दा हेच आमचे भांडवल असते.
३) आम्ही पोट जाळण्यासाठी लोकांना गुलाबी स्वप्ने दाखवतो.
४) शिकलेले लोक सुध्दा अंधश्रध्देने ग्रासलेले असतात.
५) आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्वाना पोट भरण्यासाठी कमवायचा आणि जगायचा हक्क आहे तेच मी करतोय. वेग़ळे कांहीही नाही आणि त्यात पाप नाही.
नंतर तो माणूस गेला आणि मी ऑफिसमधे. पण जाताना तो माझ्या डोक्यात वैचारिक वादळे उठवून गेला. या वैचारिक मंथनातून जन्मलेली रचना सादर करतोय. त्या काळी मी मात्रा मोजून वृत्तबध्द कविता लिहीत नव्हतो. हे वेड मला नंतरच्या काळात लागले.
अपनी रोटी भुनता हूं---
भविष्यवाणी अच्छी कहकर
सपने सबके बुनता हूं
खुश ग्राहकसे पैसे लेकर
अपनी रोटी भुनता हूं
पहनावा सब ज्ञानी जनोंका
पिंजड़ा तोता साथ साथ मे
भविष्य है बडा मृगजल जैसा
कैद किसीके हुआ हाथ मे?
ज्ञान नही है जिसका मुझको
चेहरा पहने घुमता हूं
खुश ग्राहकसे पैसे लेकर
अपनी रोटी भुनता हूं
भूतकाल का भाग रहे है
राहू, केतू और शनी सदा
भ्रम खुशियोंका पैदा करना
खास रही है मेरी अदा
भोला भाला खोजखोजकर
शिकार अपनी चुनता हूं
खुश ग्राहकसे पैसे लेकर
अपनी रोटी भुनता हूं
बुराईंया अब बीत गयी है
हर्ष पर्व कल आना है
अपनोंसे क्या? दुश्मनसे भी
हाथ मददके आना है
झूठही सही हंसी देखकर
ग्राहकके संग झूमता हूं
खुश ग्राहकसे पैसे लेकर
अपनी रोटी भुनता हूं
ऊबगया हूं झूठसे लेकिन
सच्चाईसे पेट ना भरे
बिना बताए भविष्य, संभव
नही है जीना क्या करे?
चुभनभरी अंदरकी आवाज
बेशरमीसे सुनता हूं
खुश ग्राहकसे पैसे लेकर
अपनी रोटी भुनता हूं
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment