Monday, July 11, 2022

अजबसा है चमन यारों---वीकएंड लिखाण--02.04.22

 

बदल म्हणून एक हिंदी/उर्दू रचना जी मी दिल्लीतील निर्भयाच्या मृत्यूनंतर आणि ही पार्श्वभूमीही तेंव्हाच लिहिलेली आहे ). दिल्लीतील निर्भया कांड आज लोकांच्या लक्षातही आहे की नाही कोणास ठाऊक. पण कवीचं मन विव्हळून गेलच शेवटी! या पेक्षा जास्त काय ते करू शकतं बिचारं!
आज पहाटे तिने शेवटचा श्वास घेतला. तिच्या शेवटच्या श्वासाने पूर्ण देशाचा श्वास गुदमरला. माझे स्पष्ट मत आहे की जेंव्हा असाह्य तरुणीवर बलात्कार होतो तेंव्हा तिची अब्रू तर लुटली जातेच पण खर्या अर्थाने समाजाची आणि देशाची अब्रूच लुटली जात असते हे सर्वांनी ध्यानात ठेवायला हवे.
पण एक गोष्ट खरी की त्या पिडित मुलीचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. या घटनेमुळे संपूर्ण देश आणि विशेषतः तरुणाई ढवळून निघाली आहे.. हा भविष्यासाठी शुभशकून ठरावा.
शासन आणि राजकारणी यांच्या बद्दल काय बोलावे ! सारीच संवेदनाहीन जनावरे. लहान लहान कारणासाठी कायदा हातात घेणारे, बसेसची तोडफोड करणारे, रास्ता रोको करणारे शूरवीर कुठे लपले आहेत? एका शब्दानेही ते बोलत नाहीत. ही आज देशाची शोकांतिका आहे. यातून मार्ग निघायलाच हवा. या बाबत शासन कांही करेल अशी अपेक्षा कुणीही करू नये. शेवटी तरुणाईनेच पुढाकार घ्यायला हवा.
पण इतिहास सांगतो की अशा घटना आणि अंदोलने पावसाळ्यातील कुत्र्याच्या छत्रीचे (मश्रूम) अल्पायुष्य घेवून येतात आणी जातात. पुन्हा वर्षाखेरसाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्ट्या होणार. पुन्हा मदहोश वातावरण आणि कांही स्त्रियांच्या अब्रूंचे धिंडवडे! शेवटी "जन पळ भर म्हणतिल हाय हाय" हेच खरे. असे झाले तर ब्रेव्हहर्ट मुलीचा आत्मा स्वर्गात कण्हेल "हेच फल काय मम तपाला" असे त्या मृतात्म्याला वाटेल.. अर्थात मला निराशावादी होणे आवडत नाही. लवकरच पहाट होईल, सूर्य उगवेल. या सकारात्मक घटनेसाठी वेळ आणि निमित्त हवे होते नियतीला कदाचित! ते दोन्ही आज मिळाले आहेत.
मी या घटनेने खचून गेलो होतो. उद्वेगाच्या भावनेतून दोन रचना केल्या. आज निधनाची वर्ता ऐकून पुन्हा माझ्यावर अघात झाला. मी आज ही दुर्दैवी बातमी एका उर्दू टीव्ही चॅनलवर ऐकली म्हणून कविता उर्दूतून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. मला पूर्ण कल्पना आहे की माझ्या एका कवितेमुळे कांही फरक पडणार नाही. पण माझा अक्रोश व्यक्त करण्याचा हाच एकमेव मार्ग माझ्यामधल्या दुर्बलाच्या हाताशी आहे.
सुरुवातीलाच कांही उर्दू शब्दांचे अर्थ वाचकाच्या सोयीसाठी दिले आहेत
१) माजरा--घटना २) हैवानियत--जनावरा/पशूसारखे वागणे ३) मोहताज--अवलंबून असणे, दीन असणे
४)ज़हमत-- त्रास, वेदना ५) फ़ित्रत-- स्वभाव ६) रूबरू--समोरा समोर, फेस टु फेस
७) इर्शाद-- मुशायर्यात ग़ज़ल्/शेर वाचण्यास श्रोत्यांनी दिलेली परवानगी ८) मातम--शोक, मोर्निंग
९) मरघट-- स्मशान भूमी
ना फूलका मौसम यहाँ
तितलियाँ दिखती नही
अजबसा है चमन यारों
कलियाँ यहाँ खिलती नही
लूट ली इज़्जत किसी की
माज़रा यह रोज़ का
क्या है जल्दी? मामला है
एक लंबी खोज का
फैसला आये न आये
ज़िंदगी रुकती नही
अजबसा है चमन यारों
कलियाँ यहाँ खिलती नही
भेडियोंका ख़ौफ इतना
हैवानियत का राज है
इस कदर हालात बिगडे
इन्सानियत मोहताज है
छा गया इतना अंधेरा
रोशनी दिखती नही
अजबसा है चमन यारों
कलियाँ यहाँ खिलती नही
इज़्जतोंके लुटेरोंको
डर नही, ज़हमत नही
गुनहगारोंको सज़ा दे
देश की फ़ित्रत नही
आइनेसे सूरतें भी
रूबरू करती नही
अजबसा है चमन यारों
कलियाँ यहाँ खिलती नही
ना कंही गजलें सुनी है
ना कभी इर्शाद भी
ना बाग़ावत शायरोंने
की कभी फर्याद भी
महफ़िलें गुमसुम यहाँ की
क्यूं शमा जलती नही
अजबसा है चमन यारों
कलियाँ यहाँ खिलती नही
ढेर लाशोंके पडे है
क्यों नही मातम कंही?
साँस लेते लोग है पर
ज़िंदगी जीते नही
गाँव मरघट बन गया पर
लाश भी जलती नही
अजबसा है चमन यारों
कलियाँ यहाँ खिलती नही
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment