Monday, July 11, 2022

मखमली तलत महमूद--(वीक एंड लिखाण)---22.05.22

 गेल्या आठवड्यात दोन महत्वाच्या घटना होत्या. पहिला मातृदिन आणि दुसरा म्हणजे महान गायक तलत महमूद याची पुण्यतिथी. वीक एंड लिखाणात गेल्या रविवारी आईवर लिहिले, आज तलत महमूद बद्दल लिहिण्याचा विचार घोळत होता. आज तोच प्रयत्न करणार आहे.

माझी पत्नी, सौ. जयश्रीला गाणे गायचा आणि ऐकायचा खूप छंद आहे. कोणत्याही प्रकारचे संगीत असो, ती रमून जाते. तिने आम्ही औरंगाबादला असताना शस्त्रीय संगिताचे शिक्षण पण घेतले आहे. तेथे तिचे जे गुरू होते त्यांचा सात आठ वर्षापूर्वी फोन खणाणला. मला त्यांनी आवर्जून सांगितले की सध्या सिनेसंगिताची एक लिंक ऑनलाईन उपलब्ध आहे. ही लिंक फक्त आठ दिवसासाठी उपलब्ध आहे. ही लिंक तलत महमूद यांच्या लंडनस्थित मुलाने लोड केली आहे. बघा आवडल्यास डाउनलोड करा. आम्हा दोघंचीही संगितातली ऋची पाहून त्यांनी आम्हास ही माहिती कळवली.
आम्ही लगेच सर्व गाणी संगणकावर डाऊन लोड केली. जवळ जवळ पंचावन्न मिनिटांची रेकॉर्डिंग झाली. रात्री आम्ही दोघांनी सर्व गाणी एका ब्लँक सीडी वर रेकॉर्डिंग करून ऐकली. आम्ही दोघेही मंत्रमुग्धच झालो ऐकून. ही सारी गाणी तलतने लंडनस्थित आल्बर्ट हॉल येथे लाईव्ह कार्यक्रमात गायली होती. सर्व फिल्मी, गैरफिल्मी गाण्यांचा समावेश यात आहे. या रेकॉर्डिंंगचे वैशिष्ट्य असे की सर्व गाण्यांना साथ फक्त संवादिनी आणि तबला यांची आहे. या कार्यक्रमाची अॅनकरिंग स्वतः तलतने केली आहे. वाद्य विरहीत गाणी ऐकताना समाधी लागून जाते. हॉल भारतीय आणि पाकिस्तानी प्रेक्षकांनी खच्चून भरला होता आणि प्रेक्षकांनी जी दाद दिली ती अप्रतीम अशीच होती.
अशा या अष्टपैलू गायकाचा जन्म चोवीस फेब्रुवारी, १९२४ रोजी लखनौ यथे झाला. देशातील बरेच कलाकार आपल्या कलेचा गुलदस्ता घेऊन मुंबई किंवा कलकत्ता येथे जातात. तलत हे असेच मुंबईला आले.
कांही वर्षापूर्वी माझ्या दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. तेंव्हा ८/१० दिवस डोळ्यावर काळा चष्मा लाऊन, खिडक्याचे पडदे बंद करून अंधारात वेळ घालवत होतो . अंधाराशी हितगूज करता करता काळोखाशी दोस्ती पण झाली ! वेळ घालवण्यासाठी सर्व प्रकारचे संगीत- गाणी, गजला, रागदारी, भावगिते आणि विशेष करून तलतची गाणी वगैरे वगैरे ऐकले. आणि हे करताना मला बरेच कांही गवसले. अंधारात मला खरेच नवा प्रकाश मिळाला.आपण गाणी ऐकताना नॉर्मली धुन; चाल आणि संगीत ऐकतो आणि गाण्याच्या शब्दांकडे फार कमी लक्ष असते. मी सर्व गाणी शब्दांकडे (काव्याकडे) लक्ष देवून ऐकली आणि मला वेगळाच अनुभव मिळाला.
तलतचे कोणते गाणे सर्वात जास्त आवडते हे सांगणे महाकठीण काम आहे. किती म्हणून सांगावी? तलतचा मोरपिसासारखा मुलायम आवाज, आणि त्याची जीव ओतून गायची आदा ऐकणार्यांना एका हिमालयाच्या उंचीवर घेऊन जातात. स्वर्ग सुखाचा अनुभव घेवून श्रोते चिंब होतात.
मी या लेखात शब्दांच्या महत्वाबद्दल बोललोय. मी आज जे गाणे आपणासमोर पेश करणार आहे त्याचे बोल खाली देत आहे. बघा शब्दांची जादू आणि नजाकत. शब्दांची नजाकत या गाण्यात प्रकर्षाने जाणवते. विशेषतः " गीत नाजुक है मेरा शीशे से भी टूटे ना कहीं" या ओळीत आपल्या कवितेतील आत्मविश्वास शायराने ठासून भरलेला दिसतो जो यथार्थ पण आहे. या गाण्याचे गायक, गीतकार, संगीतकार, पदद्यावरील नट सारेच काळाच्या पडद्याआड गेले आणि सहजच मनात उसासे देत शब्द उमटतात "जमानेने देखे जवां कैसे कैसे" किंवा "जाने कहां गये ओ लोग" आणि आगतिक भावना डोळ्यातून घळघळतात. link for listenong the song-- https://www.youtube.com/watch?v=jsaKIKHmz3M
.जलते है जिनके लिए
तेरी आँखों के दिये
ढूंड लाया हूं वही
गीत मै तेरे लिए
दर्द बन के जो मेरे दिल मे रहा ढल ना सका
जादू बन के तेरी आँखों मे रुका, चल ना सका
आज लाया हूं वही
गीत मै तेरे लिए
दिलमे रख लेना इसे हाथोंसे ये छूटे न कहीं
गीत नाजुक है मेरा शीशे से भी टूटे ना कहीं
गुनगुनाउंगा येही गीत मै तेरे लिये
जब तक ना ये तेरे रस के भरे होटों से मिले
यूं ही आवारा फिरेगा यह तेरी जुल्फों के तले
गाये जाउंगा येही गीत मै तेरे लिए
असा हा होनहार महागायक नऊ मे, २०९८ रोजी आपणाला सोडून पैगंबरवासी झाला आणि एका युगाचा अंत झाला.
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment