Showing posts with label Poetry by Nishikant Deshpande--गीत आणि संगीत--सौंदर्य स्थळे-- भाग १.. Show all posts
Showing posts with label Poetry by Nishikant Deshpande--गीत आणि संगीत--सौंदर्य स्थळे-- भाग १.. Show all posts

Friday, March 22, 2013

गीत आणि संगीत--सौंदर्य स्थळे-- भाग १


परवाच माझ्या दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची शस्त्र्क्रिया झाली. एक १५ मार्च आणि दुसरी १९ मार्चला झाली. गेले ८/१० दिवस डोळ्यावर काळा चष्मा लाऊन, खिडक्याचे पडदे बंद करून अंधारात वेळ घालवतोय हल्ली. अंधाराशी हितगूज करत काळोखाशी बघता बघता दोस्ती पण झाली ! वेळ घालवण्यासाठी सर्व प्रकारचे संगीत- गाणी, गजला, रागदारी, भावगिते वगैरे वगैरे ऐकले. आणि हे करताना मला बरेच कांही गवसले. अंधारात मला खरेच नवा प्रकाश मिळाला.
आपण गाणी ऐकताना नॉर्मली धुन; चाल आणि संगीत ऐकतो आणी गाण्याच्या शब्दांकडे फार कमी लक्ष असते. मी सर्व गाणी शब्दांकडे (काव्याकडे) लक्ष देवून ऐकली आणि मला वेगळाच अनुभव मिळाला. म्हणुनच मी म्हणालो की अंधारात मला प्रकाश गवसला. वेगवेगळ्या कवींनी, शायरांनी किती सुरेख शब्द सुनियोजित पध्दतीने वापरले आहेत हे बघून थक्कच झालो. एके दिवशी पूर्ण दिवस गाणी ऐकल्यानंतर या वेदनेच्या काळातही मला खालील ओळी सुचल्या या संबंधातात


काल काव्याचा मनाला स्पर्ष झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

काळजाला काल मी देऊन बसलो
कोंदणे हृदयात मी रुजवून बसलो

शब्द पाचूंचीच ती बरसात होती
मी भुकेला भेटली खैरात होती

अशा मनाच्या चिंब अवस्थेत विचार केला की माझा हा अनुभव इतरांशी शेअर करावा. मी प्रथम हिंदी सिनेलातील गीत आणि संगीताबद्दल बोलणार आहे. जुन्या काळची गाणी आणि संगीत अतिशय उच्च दर्जांची होती. हा एक मोठा खजाना आहे याची आपणास जाण असावयास हवी. अतिशय अर्थपूर्ण रचना, प्रसंगास पोषक असे संगीत, सुमधूर चाली आणि आजही ती गाणी ऐकून त्यात तल्लीन होणे या खुब्या आहेत.
मी आज जे गीत निवडले आहे ते १९५९ साली निर्मित सुजाता या चित्रपटामधील आहे. गायक-तलत महमूद, गीतकार. मजरूह सुल्तानपुरी, आणि संगीतकार-सचिनदेव बर्मन, दि ग्रेट.
तलत महमूदचा आवाज हा अतिशय हळूवार, मखमली पोताचा होता. दर्दभरे गीत गावे ते तलत महमूदनेच ही त्यांची त्या काळी ख्याती होती. त्यांचे गाणे ऐकताना हृदयावरून मोरपीस फिरवल्यागत वाटायचे. सचिनदेव बर्मन यांच्या संगीताबद्दल काय बोलावे. सगळेच अल्टिमेट असायचे. या गीतातील बासरीचे पीसेस ऐका. किती हळूवार आहेत याचा अनुभव घ्या. हे गीत खालील प्रमाणे आहेत.

जलते है जिनके लिए तेरी आँखों के दिये
ढूंड लाया हूं वही गीत मै तेरे लिए

दर्द बन के जो मेरे दिल मे रहा ढल ना सका
जादू बन के तेरी आँखों मे रुका, चल ना सका
आज लाया हूं वही गीत मै तेरे लिए

दिल मे रख लेना इसे हाथोंसे ये छूटे न कहीं
गीत नाजुक है मेरा शीशे से भी टूटे ना कहीं
गुनगुनाउंगा येही गीत मै तेरे लिये

जब तक ना ये तेरे रस के भरे होटों से मिले
यूं ही आवारा फिरेगा यह तेरी जुल्फों के तले
गाये जाउंगा येही गीत मै तेरे लिए
प्रत्येक कडवे किती प्रेमळ भावात ओथंबलेले आहे ! जो गीतकार "गीत नाजुक है मेरा शीशे से भी टूटे ना कहीं"
असे स्वतःच्या गीताबद्दल लिहितो त्याने गीत लिहिताना किती काळजी घेतली असेल. पूर्ण गाणे वाचून त्याची ही ओळ किती सार्थ वाटते !
आता थोडे पिक्चरायजेशन बद्दल. हा व्हिडियो पाहताना सर्वांना एकदम वेलकम चेंज वाटेल. डोळ्यांना, कानाला आणि डोक्याला सूदींग वाटेल. सध्याच्या गाण्याचे पिक्चरायजेशन म्हण्जे ५०/६० मुलामुलींचा घोळका मागे कुत्रे लागल्याप्रमाणे पळत असतो. वाचक रसिकांना थोड्या चांगल्या विश्वात नेण्यासाठी खाली या गाण्याची व्हिडियो लिंक देत आहे. क्लिक करून डोळे झाकून शांतपणे ऐका आपणास स्वर्गसुखाचा अनुभव येवून समाधी लागेल
http://www.youtube.com/watch?v=YwxHIkL_b7k

मी एक प्रयोग म्हणून हे लिखाण केले आहे. आपणास कसे वाटले या बद्दल जरूर मतप्रदर्शन करा म्हणजे मला पुढील दिशा मिळेल