Monday, July 11, 2022

दुर्लक्षित--- (वीक एंड लिखाण)---28.05.22

 आज एक खूपच जुना मित्र अनाचकपणे भेटला. सहाजिकच दोघांनाही खूप आनंद झाला. जुन्या कैक गोष्टी आठवत गेल्या. वर्तमानाकडून भूतकाळाकडे प्रवास केला आणि भूतकाळात जणू दोघेही आज विसरूनच गेलो. बर्‍याच वेळ हा बॅकवर्ड प्रवास झाल्यानंतर आम्ही एकमेकाचा निरोप घेतला. तो गेल्यानंतर रात्री मी अंथरुणावर पाठ टेकली पण झोप येता येत नव्हती. भूतकाळ सारखा दिसत होता. कोणत्या आठवणी केंव्हा याव्यात यास कांही कारण नसते.

मी , हा मित्र आणि अजून कांही मित्र एकदा एका स्पॉटला सकाळी जाऊन सायंकाळी परत आलो होतो. हा छोटा प्रवास खूप संस्मरणीय होता. आम्ही गेलो होतो औटिंगसाठी एका अ‍ॅग्रोफार्मवर . दिवस मजेत गेला. चार वाजता चहा घेतला आणि परतायचा विचार होता. पण फार्मच्या मालकाने सजेस्ट केले की पाच किलोमिटर अंतरावर एक वृध्दाश्रम आहे. त्याला जरूर भेट द्या. आम्ही गाडीत बसून निघालो सारे. वृध्दाश्रमात पोंचलो आम्ही. पूर्वसूचने शिवाय आम्ही गेलो तरीही आमचे यथोचित स्वागत झाले. तेथील एक आधिकारी सोबत सर्व आश्रम दाखवून माहिती देण्यासाठी मिळाला. अर्थात या ठिकाणी फक्त दु:खच दिसत असते असा माझा आधीचा अनुभव होता. तरीही प्रत्येक खोलीत आमचा समूह गेला. वृध्दांशी थोड्या गप्पा , सहानभूती दाखवायचा प्रयत्न असे कांही चालू होते. आम्ही एका खोलीत गेलो असताना त्या खोलीत एक वृध्दा दिसली. वय पंचाहत्तरच्या पुढेच असावे. दिसायला गोरीपान. का माहीत नाही पण या बाईने माझे लक्ष वेधून घेतले. सर्व मित्र दुसर्‍या खोलीत जायला निघाले. मी त्यांना म्हणालो की तुम्ही पुढे निघा. मी अर्ध्या तासात तुम्हा लोकांना जॉईन होईन. इतर मित्र खोलीतून गेल्या नंतर मी त्या वृध्देला बोलते करायचा प्रयत्न केला.
बोलताना कळाले की त्या महिलेचे नाव कमला असे होते. तिला एक मुलगा, सून आणि एक नातू होता. ते परदेशात स्थायिक होते. मी तिला लागलीच विचारले की त्या यथे एकट्या का राहतात?. तिने आवंढा गिळत सांगितले की मी येथे स्वेच्छेने रहाते. याला अनेक कारणे आहेत. मुलांनी आपल्या मर्जीप्रमाणे आपले जीवन जगावे ही माझी मनिषा आहे. मी जीवनाच्या अंतिम पाडावावर आहे. माझे जीवन जगून झाले आहे. मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे जगायची संधी मी द्यायला हवी असे मला वाटते. मलाही एकटेपणाचा त्रास होतो. पण तो माझा प्रश्न आहे आणि मीच सोडवायला हवा. मला दुसर्‍यासाठी प्रश्न बनणे पसंत नाही. हे जरी सत्त्य आहे तरी लोकांचा यावर विश्वास बसत नाही आणि येणारे लोक मला नको असलेली सहानभूती दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण तिच्याशी बोलताना, तिच्याकडे बघताना का मला माहीत नाही ती शल्य आपल्या मनात लपवत आहे असे वाटले. माझी परतायची वेळ झाली. मी निरोप घ्यायला उठलो. नमस्कार करण्यासाठी मी खाली वाकलो आणि पायांना स्पर्श केला, त्यांनी माझ्या पाठीवर हलकेच हात फिरवला. आणि काय आश्चर्य! मला माझ्या आईची आठवण आली आणि मी गदगदून गेलो. मी कंपाऊंडच्या बाहेर निघतांना वळून पाहिले तर त्या स्वतः भावनावेगाने डोळे पुसत होत्या. त्या वेळी मला आईचे वेगळेच दर्शन झाले. खाकरून घसा साफ केला आणि डोळे पुसून मित्रात सामिल झालो.
आठ दिवस मी सुन्न होतो. त्या भावनावेगा नंतर मी एका आठवड्यात आईवर दोन गझला लिहिल्या. त्यातले कांही शेर खाली पेश करा. लक्ष देवून वाचा. कदाचित आपणास आपली आई दिसेल.
गझल पहिली--
समईत देवघरच्या आईच वात होती
ओजास पसरणारी माईच ज्योत होती
निजता कुशीत रात्री गोष्टीस सांगताना
स्वप्ने मला उद्याची ती दाखवीत होती
खडतर प्रपंच सारा, खडबड असून तळवे
पाठीवरी मुलायम फिरवीत हात होती
ना गाईले कधीही भारूड वेदनांचे
अश्रूस लपवणारी ती खास प्रीत होती
गझल दुसरी--
निस्तेज नेत्र, हलके हसले मला बघूनी
नजरेतुनी झिरपते माया अपार आहे
फिरवून हात करते उपदेश आज ही ती
झालो जरी अजोबा तिज मी कुमार आहे
शिस्तीस लावताना भासे कठोर ती पण
हृदयात खोल तिचिया ओली कपार आहे
नंदादिपाप्रमाणे ती तेवली खुशीने
विझण्यास वादळाने देते नकार आहे
अजून एक सहज जिव्हारी लागलेली गोष्ट. एका मैफिलीत मी निमंत्रित शायर होतो. तिथे मी आईवरची पहिली गझल पेश केली. श्रोत्यांनी व्यवस्थित दाद दिली. नंतर चहापानाच्या वेळी एका श्रेष्ठ शायराने गप्पा मारताना मला सल्ला दिला की देश्पांडे साहेब आपण गझल छान पेश केली. पण मित्र म्हणून एक सांगू का? आई हा विषय मुळातच गझलेसाठी योग्य नाही. मनात लगेच विचार आला की जशी जीवनात तशीच गझल क्षेत्रात पण आई दुर्लक्षीतच असावी हा मोठा दुर्दैविलासच म्हणावा!
निशिकांत देशपांडे,
बालेवाडी, पुणे
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
Nilesh Shembekar, Rekha Bansode आणि अन्य १४
१५ कमेंट्स
1 शेअर
लाईक
टिप्‍पणी
सामायिक करा

मखमली तलत महमूद--(वीक एंड लिखाण)---22.05.22

 गेल्या आठवड्यात दोन महत्वाच्या घटना होत्या. पहिला मातृदिन आणि दुसरा म्हणजे महान गायक तलत महमूद याची पुण्यतिथी. वीक एंड लिखाणात गेल्या रविवारी आईवर लिहिले, आज तलत महमूद बद्दल लिहिण्याचा विचार घोळत होता. आज तोच प्रयत्न करणार आहे.

माझी पत्नी, सौ. जयश्रीला गाणे गायचा आणि ऐकायचा खूप छंद आहे. कोणत्याही प्रकारचे संगीत असो, ती रमून जाते. तिने आम्ही औरंगाबादला असताना शस्त्रीय संगिताचे शिक्षण पण घेतले आहे. तेथे तिचे जे गुरू होते त्यांचा सात आठ वर्षापूर्वी फोन खणाणला. मला त्यांनी आवर्जून सांगितले की सध्या सिनेसंगिताची एक लिंक ऑनलाईन उपलब्ध आहे. ही लिंक फक्त आठ दिवसासाठी उपलब्ध आहे. ही लिंक तलत महमूद यांच्या लंडनस्थित मुलाने लोड केली आहे. बघा आवडल्यास डाउनलोड करा. आम्हा दोघंचीही संगितातली ऋची पाहून त्यांनी आम्हास ही माहिती कळवली.
आम्ही लगेच सर्व गाणी संगणकावर डाऊन लोड केली. जवळ जवळ पंचावन्न मिनिटांची रेकॉर्डिंग झाली. रात्री आम्ही दोघांनी सर्व गाणी एका ब्लँक सीडी वर रेकॉर्डिंग करून ऐकली. आम्ही दोघेही मंत्रमुग्धच झालो ऐकून. ही सारी गाणी तलतने लंडनस्थित आल्बर्ट हॉल येथे लाईव्ह कार्यक्रमात गायली होती. सर्व फिल्मी, गैरफिल्मी गाण्यांचा समावेश यात आहे. या रेकॉर्डिंंगचे वैशिष्ट्य असे की सर्व गाण्यांना साथ फक्त संवादिनी आणि तबला यांची आहे. या कार्यक्रमाची अ‍ॅनकरिंग स्वतः तलतने केली आहे. वाद्य विरहीत गाणी ऐकताना समाधी लागून जाते. हॉल भारतीय आणि पाकिस्तानी प्रेक्षकांनी खच्चून भरला होता आणि प्रेक्षकांनी जी दाद दिली ती अप्रतीम अशीच होती.
अशा या अष्टपैलू गायकाचा जन्म चोवीस फेब्रुवारी, १९२४ रोजी लखनौ यथे झाला. देशातील बरेच कलाकार आपल्या कलेचा गुलदस्ता घेऊन मुंबई किंवा कलकत्ता येथे जातात. तलत हे असेच मुंबईला आले.
कांही वर्षापूर्वी माझ्या दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. तेंव्हा ८/१० दिवस डोळ्यावर काळा चष्मा लाऊन, खिडक्याचे पडदे बंद करून अंधारात वेळ घालवत होतो . अंधाराशी हितगूज करता करता काळोखाशी दोस्ती पण झाली ! वेळ घालवण्यासाठी सर्व प्रकारचे संगीत- गाणी, गजला, रागदारी, भावगिते आणि विशेष करून तलतची गाणी वगैरे वगैरे ऐकले. आणि हे करताना मला बरेच कांही गवसले. अंधारात मला खरेच नवा प्रकाश मिळाला.आपण गाणी ऐकताना नॉर्मली धुन; चाल आणि संगीत ऐकतो आणि गाण्याच्या शब्दांकडे फार कमी लक्ष असते. मी सर्व गाणी शब्दांकडे (काव्याकडे) लक्ष देवून ऐकली आणि मला वेगळाच अनुभव मिळाला.
तलतचे कोणते गाणे सर्वात जास्त आवडते हे सांगणे महाकठीण काम आहे. किती म्हणून सांगावी? तलतचा मोरपिसासारखा मुलायम आवाज, आणि त्याची जीव ओतून गायची आदा ऐकणार्‍यांना एका हिमालयाच्या उंचीवर घेऊन जातात. स्वर्ग सुखाचा अनुभव घेवून श्रोते चिंब होतात.
मी या लेखात शब्दांच्या महत्वाबद्दल बोललोय. मी आज जे गाणे आपणासमोर पेश करणार आहे त्याचे बोल खाली देत आहे. बघा शब्दांची जादू आणि नजाकत. शब्दांची नजाकत या गाण्यात प्रकर्षाने जाणवते. विशेषतः " गीत नाजुक है मेरा शीशे से भी टूटे ना कहीं" या ओळीत आपल्या कवितेतील आत्मविश्वास शायराने ठासून भरलेला दिसतो जो यथार्थ पण आहे. या गाण्याचे गायक, गीतकार, संगीतकार, पदद्यावरील नट सारेच काळाच्या पडद्याआड गेले आणि सहजच मनात उसासे देत शब्द उमटतात "जमानेने देखे जवां कैसे कैसे" किंवा "जाने कहां गये ओ लोग" आणि आगतिक भावना डोळ्यातून घळघळतात. link for listenong the song-- https://www.youtube.com/watch?v=jsaKIKHmz3M
.जलते है जिनके लिए
तेरी आँखों के दिये
ढूंड लाया हूं वही
गीत मै तेरे लिए
दर्द बन के जो मेरे दिल मे रहा ढल ना सका
जादू बन के तेरी आँखों मे रुका, चल ना सका
आज लाया हूं वही
गीत मै तेरे लिए
दिलमे रख लेना इसे हाथोंसे ये छूटे न कहीं
गीत नाजुक है मेरा शीशे से भी टूटे ना कहीं
गुनगुनाउंगा येही गीत मै तेरे लिये
जब तक ना ये तेरे रस के भरे होटों से मिले
यूं ही आवारा फिरेगा यह तेरी जुल्फों के तले
गाये जाउंगा येही गीत मै तेरे लिए
असा हा होनहार महागायक नऊ मे, २०९८ रोजी आपणाला सोडून पैगंबरवासी झाला आणि एका युगाचा अंत झाला.
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

मातॄ दिन--(वीक एंड लिखाण)--14.05,22

 परवाच मातॄ दिन जगभरात साजरा झाला. आठवड्यातून एक दिवस मी याच सदराखाली कांही लिखाण शनिवार/रविवारी मी प्रकाशित करत असतो. या आठवड्यात माझी जरा गोची झाली. एकाच आठवड्यात दोन दिवस साजरे झाले. दोन्हीही विभूती माझ्या आवडत्या आहेत. आई (मातृ दिन) आणि गायक तलत महमूद याचा वाढदिवस पण होता. मी आज आणि पुढील आठवड्यात दोन्हीही विषयावर लिहायचे ठरवले आणि आज त्यातील पहिला लेख पेश करतोय.

आई हा सर्वांचा आवडता विषय! हे आपल्या देशातच नाही तर सर्व जगात आहे. याबाबतीत खालील गोष्टी ध्यानात घेण्या जोग्या आहेत.
१) आई या विषयावर प्रत्येक भाषेत मुबलक आणि प्रेमभावनेतू लिखाण झालेले आहे.
२) आईला सर्व जगात/धर्मात मायेचे प्रतिक मानलेले आहे.
३)आईचा अपिरिमीत प्रेमभाव हे जगाच्या अस्तित्वाचे मूळ आहे.
४) आपल्या हिंदू धर्मात तर मातृ देवोभव, पितृ देवोभव म्हणताना देवांनाही नंतरचे स्थान दिले आहे.
मी लहानपणी आईवर लिहिलेले खूप लिखाण वाचले.
यातील एक कथा माझ्या हृदयाला गेलेली आहे अगदी बालपणी. ही कथा पटकन मन वेधून घ्यायची. ती अशी:
एक मुलगा आणि मुलगी एकमेकाच्या खूप प्रेमात पडलेले असतात. प्रियकर लग्नासाठी मुलीला अर्जव करत असतो. मुलगी त्याला म्हणते, तू तुझ्या आईचे काळीज मला आणून दे तुझे माझ्यावरील प्रेम सिध्द करण्यासाठी. नंतर आपण लग्न करू या. प्रेमात वेडा झालेला मुलगा घरी जातो आणि आईचा खून करून तिचे काळिज एका चांदीच्या तबकात मखमली कपड्यावर ठेऊन घाईघाईने प्रेयसीकडे जायला निघतो. रस्त्यात त्याचा तोल जाऊन तो पडतो आणि आईचे काळिज पण रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात पडते. मुलगा स्वतःला सावरत उठण्याचा प्रयत्न करत असताना पडलेल्या आईच्या काळजास वाचा फुटते आणि ते मुलाला विचारते "बाळा तुला जास्त लागले तर नाही ना?" ही गोष्ट एक कल्पना विलासही असेल कदाचित. पण आईविषयी बरेच कांही ही गोष्ट सांगून जाते.
एकदा मातृदिनाच्या कार्यक्रमासाठी मी निमंत्रित पाहुणा होतो आणि मी या प्रसंगी चार शब्द बोलणे अपेक्षित होते. मी या कार्यक्रमास जायचे ठरवले आणि काय बोलायचे यावर विचारमंथन सुरू झाले. आठदिवस वेळ होता तयारी करणासाठी. मी गांभिर्याने तयारी सुरू केली. मुद्दे एका कागदावर लिहून काढले. आश्चर्य म्हणजे मला दोन दिवस आधी या विषयावर एक कविता सुचू लागली. कांही दिवसात कविता पण तयार झाली जी मी खाली पेश करतोय. मी घाईघईने एक गोष्ट स्वसंरक्षणार्थ नमूद करतो की मला तेंव्हा लयबध्द कविता येत नव्हत्या.लय, मात्रा याचे कांहीही ज्ञान नव्हते. तरीह हिंमत केली. या कवितेत कांहीही आज मितीला बदल करावासा वाटेना कारण यात माझ्या भावना गुंतलेल्य होत्या. असो.
माईच ज्योत होती
समईत देवघरच्या आईच वात होती
ओजास पसरणारी माईच ज्योत होती
पाऊल उचलले मी पहिले जगात जेंव्हा
आई जणू खुशीचा साक्षात झोत होती
संगीत पाठ पहिला ऐकून तृप्त झालो
झोपेत गुंगताना ती गीत गात होती
निजता कुशीत रात्री गोष्टीस सांगताना
स्वप्ने मला उद्याची ती दाखवीत होती
विसरून आपुल्याला, बाळास पोसताना
ना गाठ पीळ कोठे, रेशीम पोत होती
खडतर प्रपंच सारा, खडबड असून तळवे
पाठीवरी मुलायम फिरवीत हात होती
नाभीत जन्मलेला ब्रह्मा उदास आहे
सांगा कुठे तयाच्या आई घरात होती?
वैकुंठ काय देशी? दे येरझार जगती
शतजन्म जीवनाचे आईच गीत होती
ना गाईले कधीही भारूड वेदनांचे
अश्रूस लपवणारी ती खास प्रीत होती
वृक्षास आज आहे एकांत वेदनांचा
पचवून दु:ख जगणे रक्तात रीत होती
ज्यांनी तिला बघावे, सारे उडून गेले
जोडून हात जगली ती शांत शांत होती
निशिकांत" माय तुजला बघते वरून आहे
तुज ठेच अन् तिच्या रे! सिसकी उरात होती
निशिकांत देशपांड, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

अपनी रोटी भुनता हूं--(वीक एंड लिखाण)--07.05.22

 खूप वर्षापूर्वीची एक जुनी प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे. ही इतक्या दिवसांनी का आठवावी हे एक एक गूढच आहे. नुसती आठवलीच नाही तर डोक्यात भिरभिरायला पण लागली जरी ती घडलेली गोष्ट तशी नगण्यच होती. मी त्यावेळी स्टेट बँके ऑफ हैद्राबादच्या हैदराबादस्थित हेड ऑफिस मधे कामाला होतो. नुकतीच बढती झाल्यामुळे अस्मादिक खुश होते. माझे घर त्यावेळी कांही दिवस औरंगाबादला होते. अधून मधून हैदरबाद ते औरंगाबाद जाणे येणे चालूच असे.

एकदा असाच मी औरंगाबाद ते हैदराबाद प्रवास करत होतो. रात्री औरंगाबाडहून बसायचे आणि सकाळी हैदराबाद. एकदा मी संध्याकाळी रेल्वेतून प्रवास करत असताना रात्री साडेआठच्या सुमारास जेवण आटोपून बर्थवर झोपायच्या तयारीत होतो तेवढ्यात एका छोट्या स्टेशनवर एक पोर्‍या डब्यात शिरला. पांढराशुभ्र पायजमा, नेहरूशर्ट, कपाळाला पांढराशुभ्र गोपीचंदाचा मोठा टिळा लावलेला . पोर्‍या एकूण चुणचुणीत होता. मोठ्याने बोलण्यावरून ध्यानात आले की तो हस्तरेषा पाहून भविष्य सांगत होता. हेच त्याचे रोजीरोटीचे साधन असावे.
त्याची बोलण्याची लकब पण खूप छान होती, तो सर्वांचे लक्ष स्वतःकडॅ वेधून घेण्यात तरबेज होता. प्रत्येकाचे भविष्य तो आत्मविश्वासाने सांगायचा. त्याचा चुणुकदारपणा पटकन डोळ्यात भरत होता. त्याची भविष्य सांगायची लकब वाखाणण्याजोगी होती. तो सर्वांचे लक्ष पटकन वेधून घेत असे. मी त्याला बघून आणि त्याच्या आत्मविश्वासावर जाम खुश होतो. अर्थात भविष्य कथनावर कुणी किती विश्वास ठेवायचा हे ज्यांनी त्यांनी ठरवायचे असते.
एक बर्‍यापैकी शिकलेले गृहस्थ भविष्य ऐकण्यासाठी त्याच्याजवळ गेले. पहिले पाच दहा ममिनिटाचे प्राथमिक बोलणे झाले की त्या पोराने त्या माणसास विचारले की तू जर भविष्य सांगू शकतोस तर ओळख मला किती लेकरे आहेत ते. त्या मुलाने बोटावर कांही तरी मोजत विचार केल्याचा आव आणला आणि सांगितले की आपणास पाच मुले आहेत. तो माणूस जिंकल्याचा आव आणत म्हणाला की तू काय भविष्य सांगणार? पहिल्याच प्रश्नाचे उत्तर चुकले तुझे. मला तीन मुले आहेत आणि तू पाच म्हणतोस! लोकांना बनवण्यासाठी तुम्ही लोक हे उद्योग करता. हार मानेल तो भविष्यकार कसला! त्याने अजून कांही चोपड्या काढल्या आणि बोटावर नवखे हिशोब मांडले. त्याने ठासून सांगितले की तुमच्या नशिबात पाचच मुले आहेत; पण आपण फॅमिली प्लॅनिंगची औषधे वापरल्याने ही सगळी गडबड झाली. त्याच्या समयसूचकतेवर खुष होवून त्या माणसाते त्याच्या हातात दहा रुपयाची नोट ठेवली आणि पुढच्या स्टेशनवर तो उतरून गेला. त्या मुलाने माझ्या मनात विचाराचे बरेच वादळ उठवले.
अजून एक विचित्र योगायोग असा की जवळ जवळ तीस वर्षांनी मी पुन्हा हेडऑफिसमधे एका डिपर्टमधे कामाला होतो. एक पंचेविशीतला तरूण डिपार्टमधे आला. पांढरेशुभ्र कपडे, चंदनाचा टिळा आणि भविष्य सांगणाराच. मी त्याला शंका आल्याने जरा खोदून विचारले असता त्याने सांगितले की येथे खूप वर्षापासून तो भविष्य सांगायला येतोय. अजून थोड्या गाप्पानंतर खात्री पटली की हा मुलगा आणि आधी भेटलीला एकच माणूस आहे. मी त्याला बोलल्यानंतर माझ्या ध्यानात आलेते असे:
१) भविष्य वगैरे कांहीही नसते. हे सारे थोतांंड आहे.
२) लोकांची अंधश्रध्दा हेच आमचे भांडवल असते.
३) आम्ही पोट जाळण्यासाठी लोकांना गुलाबी स्वप्ने दाखवतो.
४) शिकलेले लोक सुध्दा अंधश्रध्देने ग्रासलेले असतात.
५) आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्वाना पोट भरण्यासाठी कमवायचा आणि जगायचा हक्क आहे तेच मी करतोय. वेग़ळे कांहीही नाही आणि त्यात पाप नाही.
नंतर तो माणूस गेला आणि मी ऑफिसमधे. पण जाताना तो माझ्या डोक्यात वैचारिक वादळे उठवून गेला. या वैचारिक मंथनातून जन्मलेली रचना सादर करतोय. त्या काळी मी मात्रा मोजून वृत्तबध्द कविता लिहीत नव्हतो. हे वेड मला नंतरच्या काळात लागले.
अपनी रोटी भुनता हूं---
भविष्यवाणी अच्छी कहकर
सपने सबके बुनता हूं
खुश ग्राहकसे पैसे लेकर
अपनी रोटी भुनता हूं
पहनावा सब ज्ञानी जनोंका
पिंजड़ा तोता साथ साथ मे
भविष्य है बडा मृगजल जैसा
कैद किसीके हुआ हाथ मे?
ज्ञान नही है जिसका मुझको
चेहरा पहने घुमता हूं
खुश ग्राहकसे पैसे लेकर
अपनी रोटी भुनता हूं
भूतकाल का भाग रहे है
राहू, केतू और शनी सदा
भ्रम खुशियोंका पैदा करना
खास रही है मेरी अदा
भोला भाला खोजखोजकर
शिकार अपनी चुनता हूं
खुश ग्राहकसे पैसे लेकर
अपनी रोटी भुनता हूं
बुराईंया अब बीत गयी है
हर्ष पर्व कल आना है
अपनोंसे क्या? दुश्मनसे भी
हाथ मददके आना है
झूठही सही हंसी देखकर
ग्राहकके संग झूमता हूं
खुश ग्राहकसे पैसे लेकर
अपनी रोटी भुनता हूं
ऊबगया हूं झूठसे लेकिन
सच्चाईसे पेट ना भरे
बिना बताए भविष्य, संभव
नही है जीना क्या करे?
चुभनभरी अंदरकी आवाज
बेशरमीसे सुनता हूं
खुश ग्राहकसे पैसे लेकर
अपनी रोटी भुनता हूं
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

तकलादू समाधान--(वीक एंड स्फूट लिखाण)--23.04.22

जेंव्हा माझा मुलगा अनिकेत, अमेरिकेला जाऊन आठ दहा वर्षे तेथे नोकरी करून आणि ग्रीन कार्ड करूनही परत आला तेंव्हा मलाच थोडा आश्चर्याचा झटकाच बसला.कारण तेथून बस्तान गुंडाळून परत येणे त्यावेळी ऑड वाटत होते. मला बराच वेळा त्याला विचारावे असे वाटले पण मोह टाळला. कांही दिवसांनी हळू हळू कळाले की त्याची मुलगी तेव्हा सात वर्षाची झाली आणि मुलांनी आणि सूनबाईंनी ठरवले की मुलीचे पालन पोषण भारतातच करायचे आणि तिचे शिक्षण पण भारतातच! . मला तो विचार स्वागतार्ह असाच वाटला. मुलाच्या मते दहावीपर्यंतचे शिक्षण भारतीय वातावरणातच व्हावे असे होते. त्यांना मुलीला भारतीय वातावरणात वाढवायचे होते. विचार स्तुत्य होता आणि मी आणि माझी पत्नी मनोमन खुश झालो होतो. न मागता आमच्या मनासारखे झाले होते. नातीचे यथावकाश बारावी पर्यंतचे शिक्षण झाले आणि त्यांनी मुलीच्या पुढील शिक्षणासाठी तिकडे प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नंतर आम्हाला समजले की नातीला तब्बल सहा महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्या पैकी एक युनिव्हर्सिटी निवडून त्यांना परत अमेरिकेत जायचे होते. आमची स्थिती म्हणजे थोडी खुशी थोडा गम अशी होती.

इतक्यातच अनिकेतचा एक भारतातील मित्र अमिरिकेहून भारतात रजा घेऊन आला. दोघेही एकाच शाळेत होते आणि लहानपणापासू त्यांची मैत्री होती. शिक्षण एखादा वर्ग मागे पुढे असावे. तो मित्र दोन तीन वेळा घरी आला. एकदा डिनरला पण घरी आला. लहानपणापासूनची मैत्री! ते दोघे बैठकीत गप्पा मारत बसत बराच वेळ. त्यांच्या गप्पातून मला त्यांच्या अमेरिकन जीवनाबद्दल बरेच कांही कळाले. तिथले रहाणीमान, जगण्याची तर्‍हा, विचार करण्याच्या पध्दती वगैरे. त्याच्या मित्राच्या बोलण्यात नेहमी तिकडल्या रहाणीमानाची तारीफ असे आणि आपल्या चालीरितींना तुच्छ लेखत असे. हे मला खूप खटकायचे.
रस्त्यावरून कार नेताना ते दोघे पुढे बसत आणि मी मागल्या आसनावर बसत असे. त्यांच्या मनमोकळ्या गप्पा चालत असत. मुलाच्या मित्राचा नेहमीचा सूर म्हणजे आपला देश पाहिजे तशी प्रगती करत नाही म्हणून आपण अजून मागासलेले आहोत. रस्त्याने कार नेताना बाजूची घाण बघून तो शिसारी आल्याचे हावभाव दाखवत असे आणि आपला देश किती मागासलेला आहे हे माझ्या मुलालाच समजाऊन सांगत असे. नेहमी त्याच्या बोलण्यातील सूर हाच असे. रस्त्याच्या बाजूचा कचरा, कांही भागात असलेली दुर्गंधी, रस्त्यात असलेली बेवारसी कुत्री हेच विषय तो काढून भारताला कोसत होता. एका हॉटेलच्या बाहेर पडलेला कचरा बघून " यू इंडियन्स" म्हणून मनसोक्त नावे ठेवत असे. त्याचा एकूण सूर असा की तो देशात येवून त्याने आपल्या देशावर उपकारच केले आहेत. मला खूप वाईट वाटायचे हे ओंगळवाणे उद्गार ऐकून. मी त्यादिवशी माझी नाराजगी मुलाजवळ व्यक्त केली आणि त्याला म्हणालो की मी उद्यापासून सोबत येणार नाही.
दुसरेदिवशी त्यांना युनिव्हर्सिटी रोडला जायचे होते. माझ्या बायकोने मला सोबत जाऊन कांही सामान त्याच भागातून आणायचे सांगितले. मनात नसताना मला पुन्हा त्या दोघाबरोबर जाणे भाग होते आणि मी नाविलाजाने निघालो. गाडी गर्दीतून रस्ता काढत ट्रॅफिकमुळे हळू हळू चालली होती. पुणे विद्यापीठाच्या चौकात गाडी अगदी हळू हळू चालली होती. चौकात गाडी सिग्नल आणि ट्रॅफिकमुळे हळू हळू चालली होती. चौकात रेड सिग्नल असल्यामुळे गाडी एकदम थांबली. लागलीच फाटक्या कपड्यातील बारा तेरा वर्षाची मुलगी गाडीजवळ भीक मागण्यासाठी आली. माझ्या मुलाचा मित्र मुलाला सांगत होता की ती तोकड्या वस्त्रातील मुलगी किती सेक्सी दिसतेय नाही! उन्हामुळे स्कीन जी काळी पडली आहे ना त्यात खूप सेक्सी अपील असते असे पाश्चात्य लोक मानतात. अशा स्किनला फार डिमांड आहे तिकडे. हे सारे ऐकून माझ्या डोक्यात तिडीकच उठली. मी चौक क्रॉस केला की गाडी थांबवायला सांगितले आणि मी उतरून त्यांना बाय केले. माझा गुदमरलेला जीव थोडा हायसा झाला. परत येताना ती मुलगी परत भेटली. तिला मी परत हटकले आणि विचारपूस केली. तिने सांगितलेले ऐकून मी चकितच झालो. तिने थोडक्यात सागितलेली हकिकत अशी:
तिला लहान असताना आई पासून पळवले होते. तिचा एक हात कोपरात मुडपून चार महिने बांधून ठेवला होता. नंतर तो हात रक्त पुरवठा न झाल्याने लुळा झाला. आणि तिला भीक मागायाला लावून उत्पन्नाचे साधन बनवले. दोन वेळेचे जेवण देवून पळवलेला माणूस भिकेचे पैसे घेऊन जातो. हा त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी चालू असलेला व्यवसाय आहे. मी गलबलून त्या मुलीच्या हातात शंभरची नोट घातली आणि त्यातच तकलादू समाधान मिळवलं. कुठे तो अमेरिकेत रहाणारा मुलाचा घाणेरडा मित्र, कुठे ती भीक मागणारी पोर आणि शंभर रुपये देवून स्वतःला तकलादू समाधान मिळवणारा मी?
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. नं. ९८९०७ ९९०२३

श्वान की व्यथा--( वीकली लिखाण )--09. 04. 22

 जसजसे आपण आजूबाजूला डोळस नजरेने बघतो; तसतसे आपणास भोवताली घडणार्‍या घटनांचे नवीन संदर्भ लागतात. हे आपणास कळत नकळत नेहमीच घडत असते. यातूनच कांही अंशी आपला जीवनाबद्दलचा दृष्टीकोन घडत/बदलत असतो. आपण फक्त जीवनाकडे डोळस/चौकस नजरेने बघायला शिकायला हवे. भोवताली घडणार्‍या घटना माणसाने कधीही सहजासहजी स्विकारल्या नाहीत तर बरेच विचारमंथन त्या बाबतीत समाजात सातत्याने होत आलेले आहे. या प्रक्रियेतूनच समाज प्रगल्भ होत असतो हे आपल्या ध्यानात येईल जर आपण कारणमिमांसा केली तर.

अशा कित्येक गोष्टी घडत असतात ज्यावर विचार मंथन होणे गरजेचे आहे नसता समाज रूढी परंपरात बांधलेला बघायला मिळेल. डोळस विचार प्रक्रिया ही नेहमीच काळाची गरज असते.
आज एका खास बाबीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मी करणार आहे. समाजाच्या चालीरितीत काळाप्रमाणे बदल हे आवश्यक असतात. पण कांही बाबतीत अशा गोष्टींचा अतिरेक पण होताना दिसतोय. हे विधान करताना माझ्या डोळ्यासमोर सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएलिटी टू अ‍ॅनिमल्स या कायद्याचा आणि संस्थेच्या कामाबद्दल मनात विचार येतात. या संस्थेचा उद्देश खूप चांगला आहे. या संस्थेची स्थापना समाजातील मोठ्या लोकांच्या आशिर्वादातून झालेली आहे आणि उद्देश्य पण प्रशंसनीय असेच आहेत. एक मोठा "पण" यात येत आहे. ही संस्था आणि कायदा पण मोठ्या समाजाचे चोचले या नजरेतून पाहिले जात आहेत. या कायद्यातील कडक दंडात्मक तरतुदी एवढ्या जाचक आहेत की सर्वसाधारण माणसात त्यांना दुय्यम लेखल्याची भावना निर्माण झालेली दिसते. मी अमेरिकेत गेलो तेंव्हा मोठमोठ्या दुकानातून पाली पाळण्याची प्रथ पाहिली आहे. सुंदर मुली (गिर्हाईक) हातावर जिवंत पाली घेऊन थाटात मिरवत असतात. कुत्रे, मांजर या पाळीव प्रण्यांचा तर माणसांना हेवा वाटावा अशी परिस्थिती दिसते कधी कधी. त्यांना मिळणारे अपरंपार प्रेम आणि त्यांचे होणारे अपरंपार कौतूक माणसांनाही हेवा वाटावा असे असते. आज विशेषतः कुत्र्याबद्दल थोडे लिहिणार आहे.
आमचा डॉगी बिलकुल चावत नाही, आमच्या डॉगीला हे आवडते, ते आवडते. तो शिळी भाकरी आणि उरलेले अन्न बिलकुल खात नाही. त्याला पेटफुडच लागते खायला. आठवड्यातून दोन दिवस नॉनव्हेज लागते त्याला. असे डॉगी पुराण मालकाचे सतत चालू असते कुणी पाहुणे त्यांच्या घरी गेल्या क्षणापासून. अशा लोकांच्या घरी जर आपण गेलो तर लागलीच दोन किलो वजनाचा फोटो अलबम हातात ठेवला जातो. त्यात घरातील सर्व कुटुंबातील सदस्यांबरोबर डॉगीचे कौतुक बघावे/ ऐकावे लागते. हा फोटो पहिल्या वाढदिवसाचा हा..असे मालकाचे पुराण चालूच असते जे आपणास निमूटपणे ऐकावे लागते. ज्यांच्या घरी पाळीव कुत्रे (सॉरी डॉगी) आहेत त्या घरातले एकूण वातावरणच डॉगीमय झालेले असते आणि आलेल्या पाहुण्याला एक कप चहा घेण्यासाठी ते ऐकण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. माझा एक उच्चभ्रू मित्र आहे. खूप दिवसांनी मी त्याच्याकडे गेलो असता त्याचे डॉगी प्रेम असेच उचंबळून आले आणि झाली सुरुवात! त्याची ब्रीड कोणती आहे, त्याचा मूळ देश कोणता. सुरू झाला मित्र! मी जांभया देतोय हे त्याच्या गावीही नव्हते. त्यांच्या अलबम मधे सर्वात जास्त फोटोज डॉगीचेच होते. माझ्यापेक्षा हाच जास्त नशीबवान होता असे माझ्या मध्यमवर्गीय मनाला वाटून गेले. तर असे हे डॉगी पुराण!
हे सर्व ऐकून, पाहून माझ्या मनात वेगवेगळे विचार घोळायला लागले. या डॉगींच्या मनातही कांही विचार असतीलच ना! आणि एका कवीच्या मनात विचारचक्र सुरू झाले. कुत्र्यांनाही कांही भावना असतीलच ना! त्या काय असू शकतात याचा विचार सुरू झाला. अर्थात माझ्या मध्यमवर्गीय कुवतीनुसारच!
प्रथम मनात विचार आला की सर्व कुत्र्यांना अभिनेता अमिताभ बच्चान याच्या विरुध्द खूप राग असावा. कारण तो कित्येक सिनेमात आवेशात म्हणाला आहे खलनायकाला उद्देशून "मै तेरी सारी हड्डियां तोडकर बोटी बोटी बनाकर कुत्तों को खिलाऊंगा." कुत्रे बिचारे किती दिवसापासून वाट बघत आहेत पण अमिताभने हे वचन पूर्ण केलेले नाही. शिवाय आपण माणसे, श्वानांचा उपयोग शिव्या देण्याकरिता सर्रास करतो जसे की "कुत्ता! कमिना!" याचा पण त्यांच्या मनात राग असेलच ना! आपण किती सहजासहजी म्हणतो "साला कुत्तेकी मौत मरगया"
या विचारात गुरफटल्यानंतर मनात आले की श्वानाचे पण काही म्हणणे असेलच ना माणसांबद्दल! ते काय असू शकते या कल्पनाविलासातून आकारलेली हिंदीत लिहिलेली एक जुनी कविता खाली पेश करतोय. बघा कशी वाटतेय ती.
श्वान की व्यथा
जब मै सुनाउं मेरी नही, पूरे श्वान जन की व्यथा
बन जायेगी इन्सानों के घटियापन की कथा
समानताएं कुछ होती है, देव और दानव मे
वैसेही कुछ होती है श्वान और मानव मे
आपमे कुछ तो अमीर है, बाकी है बिकते सस्ते मे
हममे से कुछ बंगलों मे, बाकी रहते है रस्तेमे
आगे पीछे करते हो तुम, जिस से आप का हो फायदा
देख के मालिक दुम हिलाना, हमारे पास भी है कायदा
पा कर सफलता मतलब मे, आप है जाते उसको भूल
धक्का खाके भी मालिक से, ईमान रखना अपना कूल
संस्कृतीका अपनेही करते रहते हो टणत्कार
हम तो कभी नही करते, मादियों पर बलात्कार
दुसरोंका चूस कर खून, संचय न करे कल के लिए
हम है हरदम सैलानी, जीते है आज पल के लिए
हो कर मोहीत आप पर, कुछ कुत्ते है घुसे आप मे
पता नही आपको शायद, डूब रहे है पाप मे
आतंकवादी भेजनेका आज कल है जमाना
हमने भेजे है और कोई आपने शायद न जाना
भ्रुण हत्त्या करने डॉक्टर भेजे, और झगडे करने प्लीडर
आतंक अच्छा मचा रहे है, कामगारके लीडर
नेता आप मे कौन है, हमे कुछ पता नही
ढूंढ ढूंड कर थक गये, पा न सके उनको कंही
अंदरसे संसद के क्यों भोकना सुनाई देता है?
अंदर मेरे भाई बहन या आपके नेता है?
तुम तो कारण हो औरों की पीडा और व्यथाओं के
खलनायक हो तुम हमारी व्य्थापूर्ण कथाओंके
तुम पर भोंके तो क्या भोंके, गुस्सा नही आता है तरस
अंतर मन मे झाको बदलो, बीत न जाये और बरस
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

अजबसा है चमन यारों---वीकएंड लिखाण--02.04.22

 

बदल म्हणून एक हिंदी/उर्दू रचना जी मी दिल्लीतील निर्भयाच्या मृत्यूनंतर आणि ही पार्श्वभूमीही तेंव्हाच लिहिलेली आहे ). दिल्लीतील निर्भया कांड आज लोकांच्या लक्षातही आहे की नाही कोणास ठाऊक. पण कवीचं मन विव्हळून गेलच शेवटी! या पेक्षा जास्त काय ते करू शकतं बिचारं!
आज पहाटे तिने शेवटचा श्वास घेतला. तिच्या शेवटच्या श्वासाने पूर्ण देशाचा श्वास गुदमरला. माझे स्पष्ट मत आहे की जेंव्हा असाह्य तरुणीवर बलात्कार होतो तेंव्हा तिची अब्रू तर लुटली जातेच पण खर्‍या अर्थाने समाजाची आणि देशाची अब्रूच लुटली जात असते हे सर्वांनी ध्यानात ठेवायला हवे.
पण एक गोष्ट खरी की त्या पिडित मुलीचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. या घटनेमुळे संपूर्ण देश आणि विशेषतः तरुणाई ढवळून निघाली आहे.. हा भविष्यासाठी शुभशकून ठरावा.
शासन आणि राजकारणी यांच्या बद्दल काय बोलावे ! सारीच संवेदनाहीन जनावरे. लहान लहान कारणासाठी कायदा हातात घेणारे, बसेसची तोडफोड करणारे, रास्ता रोको करणारे शूरवीर कुठे लपले आहेत? एका शब्दानेही ते बोलत नाहीत. ही आज देशाची शोकांतिका आहे. यातून मार्ग निघायलाच हवा. या बाबत शासन कांही करेल अशी अपेक्षा कुणीही करू नये. शेवटी तरुणाईनेच पुढाकार घ्यायला हवा.
पण इतिहास सांगतो की अशा घटना आणि अंदोलने पावसाळ्यातील कुत्र्याच्या छत्रीचे (मश्रूम) अल्पायुष्य घेवून येतात आणी जातात. पुन्हा वर्षाखेरसाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्ट्या होणार. पुन्हा मदहोश वातावरण आणि कांही स्त्रियांच्या अब्रूंचे धिंडवडे! शेवटी "जन पळ भर म्हणतिल हाय हाय" हेच खरे. असे झाले तर ब्रेव्हहर्ट मुलीचा आत्मा स्वर्गात कण्हेल "हेच फल काय मम तपाला" असे त्या मृतात्म्याला वाटेल.. अर्थात मला निराशावादी होणे आवडत नाही. लवकरच पहाट होईल, सूर्य उगवेल. या सकारात्मक घटनेसाठी वेळ आणि निमित्त हवे होते नियतीला कदाचित! ते दोन्ही आज मिळाले आहेत.
मी या घटनेने खचून गेलो होतो. उद्वेगाच्या भावनेतून दोन रचना केल्या. आज निधनाची वर्ता ऐकून पुन्हा माझ्यावर अघात झाला. मी आज ही दुर्दैवी बातमी एका उर्दू टीव्ही चॅनलवर ऐकली म्हणून कविता उर्दूतून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. मला पूर्ण कल्पना आहे की माझ्या एका कवितेमुळे कांही फरक पडणार नाही. पण माझा अक्रोश व्यक्त करण्याचा हाच एकमेव मार्ग माझ्यामधल्या दुर्बलाच्या हाताशी आहे.
सुरुवातीलाच कांही उर्दू शब्दांचे अर्थ वाचकाच्या सोयीसाठी दिले आहेत
१) माजरा--घटना २) हैवानियत--जनावरा/पशूसारखे वागणे ३) मोहताज--अवलंबून असणे, दीन असणे
४)ज़हमत-- त्रास, वेदना ५) फ़ित्रत-- स्वभाव ६) रूबरू--समोरा समोर, फेस टु फेस
७) इर्शाद-- मुशायर्‍यात ग़ज़ल्/शेर वाचण्यास श्रोत्यांनी दिलेली परवानगी ८) मातम--शोक, मोर्निंग
९) मरघट-- स्मशान भूमी
ना फूलका मौसम यहाँ
तितलियाँ दिखती नही
अजबसा है चमन यारों
कलियाँ यहाँ खिलती नही
लूट ली इज़्जत किसी की
माज़रा यह रोज़ का
क्या है जल्दी? मामला है
एक लंबी खोज का
फैसला आये न आये
ज़िंदगी रुकती नही
अजबसा है चमन यारों
कलियाँ यहाँ खिलती नही
भेडियोंका ख़ौफ इतना
हैवानियत का राज है
इस कदर हालात बिगडे
इन्सानियत मोहताज है
छा गया इतना अंधेरा
रोशनी दिखती नही
अजबसा है चमन यारों
कलियाँ यहाँ खिलती नही
इज़्जतोंके लुटेरोंको
डर नही, ज़हमत नही
गुनहगारोंको सज़ा दे
देश की फ़ित्रत नही
आइनेसे सूरतें भी
रूबरू करती नही
अजबसा है चमन यारों
कलियाँ यहाँ खिलती नही
ना कंही गजलें सुनी है
ना कभी इर्शाद भी
ना बाग़ावत शायरोंने
की कभी फर्याद भी
महफ़िलें गुमसुम यहाँ की
क्यूं शमा जलती नही
अजबसा है चमन यारों
कलियाँ यहाँ खिलती नही
ढेर लाशोंके पडे है
क्यों नही मातम कंही?
साँस लेते लोग है पर
ज़िंदगी जीते नही
गाँव मरघट बन गया पर
लाश भी जलती नही
अजबसा है चमन यारों
कलियाँ यहाँ खिलती नही
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३