( आशातच बँकेतली अनेक लफडी उघडी पडली. मी स्वतः बँकेत नोकरी केलेली असल्यामुळे मला या सार्या प्रकरणातली दाहकता प्रकर्षाने जाणवली. उद्विग्न होऊन लिहिलेली कविता. )
हतबल झाला उजेड इतका! प्रभाव सरला रविकिरणांचा
जो तो आहे भोई येथे पालखीतल्या अंधाराचा
काळोखाची मशाल घेउन प्रकाश शोधायास निघालो
जरी निराशा पदरी पडली, देवाला विणवून म्हणालो
धुलीकणाने युक्त तरीही, हवा कवडसा एक उन्हाचा
जो तो आहे भोई येथे पालखीतल्या अंधाराचा
वस्त्रहरण त्या पांचाळीचे, जसे जाहले भरदरबारी
अंधाराच्या आधिपत्त्याची, प्रथम वाजली तिथे तुतारी
कलियूगी वाढला केवढा! प्रतिध्वनी त्या किंचाळ्यांचा
जो तो आहे भोई येथे पालखीतल्या अंधाराचा
काळे धंदे, काळी करणी, काळा पैसा, उजळ मुखवटा
शुचित्व मेले, खोल गाडले, कोण पाळतो आज दुखवटा?
पिंडालाही काक शिवेना, धनी जाहलो पराजयाचा
जो तो आहे भोई येथे पालखीतल्या अंधाराचा
हिरा असो वा सोने, चांदी ध्येय आमुचे एकच असते
स्फटिकांच्याही आत शोधता, अमाप काळे धन सापडते
नेते, बाबू, आम्ही मिळुनी, खेळ खेळतो लुटावयाचा
जो तो आहे भोई येथे पालखीतल्या अंधाराचा
मदार सारी या देशाची, तरुणांनो! तुमच्यावर आहे
पाठलाग जा करा जिथे मोठ्या चोरांचा वावर आहे
मनी असू द्या निश्चय, त्यांना वेशीवरती टांगायाचा
जो तो आहे भोई येथे पालखीतल्या अंधाराचा
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:
Post a Comment