जरी गंजला बाण भात्यात आहे
पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आहे
किती नाच नंगा नि धुडगूस त्यांचा!
असे दबदबा आज सत्तेत ज्यांचा
करा नागवे लाच जो खात आहे
पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आहे
लढू या चला रूढ चाली रितींशी
न व्हावी कळी मंदिरी देवदासी
गुन्हेगार बाबा, पुजर्यात आहे
पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आहे
नको कूट विद्या, करूयात हल्ला
नको धर्मग्रंथातला एक सल्ला
कसोटी खरी आज लढण्यात आहे
पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आहे
हवा कृष्ण का? आजच्या द्रौपदीला
करा शक्तिशाली तिच्या आतलीला
तिचे ध्येय धगधग निखार्यात आहे
पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आहे
चला आजच्या सर्व न्यायाधिशांना
बजाऊत खटले जरा संपवा ना!
इशारा जनांच्या दबावात आहे
पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आहे
नमस्कार करण्यास जे हात जुडले
अता बंडखोरी करायास उठले
समाधान दडले उठावात आहे
पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आहे
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mali--- nishides1944@yahoo.com
पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आहे
किती नाच नंगा नि धुडगूस त्यांचा!
असे दबदबा आज सत्तेत ज्यांचा
करा नागवे लाच जो खात आहे
पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आहे
लढू या चला रूढ चाली रितींशी
न व्हावी कळी मंदिरी देवदासी
गुन्हेगार बाबा, पुजर्यात आहे
पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आहे
नको कूट विद्या, करूयात हल्ला
नको धर्मग्रंथातला एक सल्ला
कसोटी खरी आज लढण्यात आहे
पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आहे
हवा कृष्ण का? आजच्या द्रौपदीला
करा शक्तिशाली तिच्या आतलीला
तिचे ध्येय धगधग निखार्यात आहे
पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आहे
चला आजच्या सर्व न्यायाधिशांना
बजाऊत खटले जरा संपवा ना!
इशारा जनांच्या दबावात आहे
पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आहे
नमस्कार करण्यास जे हात जुडले
अता बंडखोरी करायास उठले
समाधान दडले उठावात आहे
पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आहे
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mali--- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment